Close

सारं काही तिच्यासाठी मालिकेतून खुशबू तावडेने घेतला निरोप, शेअर केली खरी गुड न्यूज ( Umai Aka Khushbu Tawde Exit From Sar Kahi Tichyasathi Serial, Due to Pregnancy )

वर्षभर 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप देत आहे. याला कारण ठरलंय खुशबूकडे असलेली एक गुड न्यूज. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. प्रत्येक स्त्री प्रमाणे खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास काम करत पूर्ण केला. खुशबू कडून ऐकूया तिचा हा प्रवास कसा होता आणि मालिकेला निरोप देत असताना तिच्या मनात काय भावना आहेत.

"उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. झी मराठी सोबत काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेने पूर्ण केली. २०२३ जुलै मध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु केले होत आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. ह्याचसोबत मला एक वेगळा प्रेक्षक वर्ग लाभला. उमा आणि ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ राहील. मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण, जितके सण आहेत तितके ह्या मालिकेत आणि सेट वर आम्ही साजरे केले. गंमत अशी की काही मालिका कधी- कधी आधी शूट करतात पण आमचं नेमकं ज्यादिवशी तो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेट वरती वेगळीच ऊर्जा असायची. अतिशय खास कारण आहे की मी उमाला आणि मालिकेला निरोप देत आहे. हा खरंच गुडबाय आहे कारण खूप छान कारणांनी बाय बोलतेय.

मालिकेमुळे मला उमाई म्हणून ओळख मिळाली आणि आता ह्या उमाईची खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आली आहे. ह्या काळात 'सारं काही तिच्यासाठी' शूटिंग करण्याचा अनुभव अदभूत होता. सुरवातीला मला माहिती नव्हतं की हा प्रवास कसा असणार आहे. कारण सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी नाहीतर प्रोडक्शनसाठी ही, पण मी स्वतःला एक मंत्र समजावलं होता की आजचा दिवस आणि आजचा क्षण हा जास्त महत्वाचा आहे.

प्रत्येक दिवस नव्याने सामोरे जायचं आणि काम करायचं. शूट करताना मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. ह्या ८ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबु सापडली आणि मला ह्यासाठी प्रोडक्शन आणि झी मराठीचे खूप खूप आभार मानायचे आहेत. जसं ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली त्यांना जितका आनंद झाला तितकाच माझ्या झी मराठीच्या कुटुंबाला सुद्धा झाला. प्रत्येकानी उत्तम प्रकारे मला प्रतिसाद दिला, हिम्मत वाढवली."

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/