Close

कपूर कुटुंबीयांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सव (Kapoor Family Ganesh Chaturthi)

संपूर्ण कपूर कुटुंबाने यंदाही मोठ्या उत्साहाने गणरायाचं स्वागत केलं. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं होतं. त्याचे फोटो अभिनेत्री करिश्मा कपूरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमधील चिमुकल्या राहाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या फोटोंमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब पाहायला मिळतंय.

पूर्वी आर. के. स्टुडिओमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन व्हायचं. या स्टुडिओमधील बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकसुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घ्यायची. कपूर कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचायचे. मात्र आर. के. स्टुडिओ विकल्यानंतर आता कपूर कुटुंबीय हे त्यांच्या घरीच गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत.

नुकतेच अभिनेत्री करिश्मा कपूरने कुटुंबीयांसोबत साजरा केलेल्या गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कपूर कुटुंबीयांच्या आताच्या पिढीने नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष वेधलं आहे. रणबीर कपूरच्या मांडीवर बसलेली राहा, करीना कपूरची मुलं जेह आणि तैमुर यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.

यावेळी राहाने हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर रणबीरने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता. नेहमीप्रमाणे करीनाचा छोटा मुलगा जेह मस्तीच्या अंदाजात दिसला. तर तैमुर त्याचे आजोबा रणधीर कपूर यांच्यासोबत बसला होता.

या फोटोंमध्ये बबिता आणि रणधीर कपूर यांच्यासोबतच रणधीर यांची बहीण रिमा जैन, त्यांची दोन मुलं अरमान आणि आदर जैन, आदरची गर्लफ्रेंड आलेखा अडवाणी हे सर्वजणसुद्धा दिसले.

'मोदक आणि आठवणी' असं कॅप्शन देत करिश्मा कपूरने हे फोटो पोस्ट केले आहेत. कपूर कुटुंबीय प्रत्येक सण-उत्सव एकत्र साजरा करतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/