Close

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नवीन सीझनच्या शुटिंगला सुरुवात. प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ (The shooting of the new season of ‘Maharashtra’s Laughter’ has started, Prajakta Mali shared the video.)

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ह्या शोने ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक हा शो पुन्हा कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत होते. याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले.

शिवाय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री प्राजक्ता माळी सांभाळत आहे. मागील काही पर्व प्राजक्ता या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर प्राजक्ताने हास्यजत्रेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने हास्यरसिकांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'We Are Back!' असं म्हणत व्हिडीओमधून तिने नव्या सीझनच्या शुटिंगला सुरूवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेतील कलाकार तसेच शोमध्ये असणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हनकर दिसत आहेत. येत्या २ डिसेंबरपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शूट केल्याचा पाहायला मिळतोय. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं सगळ्यांना सांगताना दिसत आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक खुश झाले असून सर्वजण या नव्या सिझनसाठी आतुर आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ - कॉमेडीची हॅटट्रिक!” २ डिसेंबरपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/