Close

अभिनेत्री सई ताम्हणकरची नव्या वर्षाची सुरुवात आव्हानात्मक; सईचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ होतोय व्हायरल (Sai Tamhankar Shared Videos Of Her Paragliding Adventures)

नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सई ताम्हणकर नेहमी तिच्या वेगवेगळ्या भूमिकाने प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. नवीन वर्षाची सुरुवात अभिनेत्रीने आव्हानात्मक केली आहे. ज्यामध्ये सई ताम्हणकर अभिनयाच्या पलिकडे जाऊन पायलट बनली आहे. ती पायलट होण्याचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. ती जिद्दीनं हे प्रशिक्षण पू्र्ण करत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

नुकताच सई ताम्हणकरचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये सई ताम्हणकर थोडीशी घाबरलेली आहे असं म्हणताना दिसतेय. तर त्या ठिकाणी असणारा एक व्यक्ती तिला थोडसं घाबरणं चालतं, पण जास्त घाबरणं चांगलं नाही असं सांगत आहे. यानंतर सई मोठ्याने ओरडताना दिसतेय. कारण तिच्या मनात सोलो फ्लाइटसाठी धाकधूक दिसत आहे. पण तिने जिद्द सोडली नाही तिला अवकाशात झेप घेण्याचा आनंद घेयचा होता. सध्या सई ताम्हणकरच्या या व्हिडीओ चाहते देखील प्रचंड कमेंट्स करत आहे. त्यासोबतच काही चाहते तिच्या धाडसाचे देखील कौतुक करत आहेत.

पॅराग्लायडिंग केल्यानंतर सई ताम्हणकरने तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गड जिकंलास अशी कमेंट केली आहे. तर स्वप्नील जोशीने Whoaaaaaa!! kadakkkkk!! अशी प्रतिक्रिया दिलीय. अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

सध्या सई ताम्हणकर महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील कार्यक्रमात हास्यरसिक  या भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ती 'मानवत मर्डर्स' या सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिने समंद्रीची भूमिका साकारली होती. सई ताम्हणकरच्या या सीरिजला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/