Close

बनाना ब्रेड बॉल्स (Banana Bread Balls)

संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत आणि हलकंफुलकं खायचंय तर मग हे बनाना ब्रेड बॉल्स नक्की करुन बघा.

साहित्य :

१ केळं (पिकलेलं आणि स्लाइसमध्ये चिरलेलं)

२ टीस्पून तूप

१ टेबलस्पून साखर

२ ब्रेड स्लाइस (छोटे-छोटे तुकडे करून घ्या)

२ टेबलस्पून दूध

तळण्यासाठी तेल

कृती :

एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात केळ्याचे तुकडे आणि साखर घाला.

केळ्याचे काप दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत शेकून घ्या.

त्यात दूध आणि ब्रेड घालून सतत ढवळत राहा म्हणजे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल.

त्यानंतर आचेवरुन घाली घ्या.

हातांना तेल लावून मध्यम आकाराचे बॉल्स बनवून गरम तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्या.

आता गरमागरम सर्व्ह करा.

Share this article