आज जागतिक दुर्मिळ रोग दिन साजरा केला जात आहे. आपल्या देशात जे रोग दुर्मिळ समजले जातात, त्यामध्ये ५ हजार लोकांमध्ये एकास त्याची लागण होते. या संबंधी माहिती देताना नारायण हेल्थ संचालित एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे पेडियाट्रिक रुमॅटोलॉजी सिनियर कन्सल्टंट डॉ. राजू खुबचंदानी यांनी सांगितलं की, जवळपास ७० टक्के दुर्मिळ रोग आनुवंशिक असतात. त्यानंतर संधीवाताची पाळी येते. हा रोग जिन्सशी संबंधित समस्यांमुळे होतो. विशेष म्हणजे तो युवा पिढीत जास्त करून आढळून येत आहे.

याच हॉस्पिटलातील पेडियाट्रिक रुमॅटोलॉजी डॉक्टर अर्चना खान यांच्या मते बालकांना देखील संधीवात होऊ शकतो. सर्वच डॉक्टरांना याची कल्पना नसल्याने योग्य ती उपाययोजना वेळेवर होऊ शकत नाही. बरेचसे संधीवात जुनाट असतात. त्यामुळे उपचार आणि काळजी जन्मभर घ्यावी लागते.

वेळेवर उपचार केले गेले तर बऱ्याच रुग्णांना जीवनदान देता येईल, असे सांगून या दुर्मिळ रोगाबाबत डॉक्टरांनी जागरुकता निर्माण केली पाहिजे, असे या दोन्ही डॉक्टरांनी या जागतिक दिनानिमित्त सांगितले.