जागतिक महिला दिन जवळ येत चालला आहे. त्याचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचे औचित्य साधत मुंबईमध्ये महिला उद्योजकांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. नुवामा वेल्थ आयोजित ‘ब्लू बिंदी प्रोग्राम’ अंतर्गत या पहिल्या वहिल्या मेळाव्यात महिला उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते. तसेच सुमारे १० हजार ग्राहकांशी दिवसभर संवाद साधत, त्यांनी आपल्या व्यवसायाची प्रेरक वाटचाल व केलेले धाडस कथन केले.

वी बाजारच्या या कार्यक्रमात ११ निवडक महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि विशेष उत्पादनांच्या आधारे १०० प्रवेशिकांमधून त्यांची निवड करण्यात आली होती. हे उद्योग हस्तकला, दागिने, चविष्ट पदार्थ व खास जीवनशैली उत्पादनांचे होते. त्यातून महिला उद्योजकांची महत्त्वाकांक्षा, कलात्मकता दिसून आली. त्यामध्ये सिद्धी शेळके, सपना सरदेसाई, श्रुती पाटील महागांवकर, रेणुका पाटील, अल्पना पाटील या मराठी उद्योजिका दिसून आल्या.
नुवामाचा हा प्रमुख उपक्रम महिला सक्षमीकरण व आर्थिक साक्षरतेवर भर देत असून आपल्या संवादात्मक उपक्रम व सोशल मीडियाच्या सहाय्याने देशभरातील १० लाख महिलांपर्यंत तो पोहचला आहे.