Close

एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा सीझन २ येणार (Ekta Kapoor Serial Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Coming Soon)

टेलिव्हिजनची लोकप्रिय मालिका क्योंकी सास भी कभी बहू थी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. या मालिकेने आधी देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. एका स्त्रीच्या आयुष्यात लग्न झाल्यावर कशी सुख, दुःख येतात. तिच्या आयुष्यातील विविध वळणे या मालिकेतून दाखवण्यात आली आहे. आता लवकरच या मालिकेचा सीझन २ येणार आहे.

एकता कपूरने एका मिडिया मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, एकता कपूरची क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरा सीझन १५० भागांचा असेल. याचे कारण एकता कपूरने सांगितले की, क्योंकी सास भी कभी बहू थी संपताना २००० एपिसोड पूर्ण होण्यासाठी १५० भाग शिल्लक होते. त्यामुळे आता ते १५० पूर्ण होणार आहेत. २००० एपिसोड्‌चा टप्पा गाठणे हा मालिकेचा हक्क आहे.

एकता कपूरने स्मृती इराणी तुलसीच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळतील अशी हिंट देखील दिली आहे. ती म्हणाली की, “या मालिकेत एक राजकारणी देखील असेल.” मीडिया रिपोर्टनुसार, क्योंकी सास भी कभी बहू थी सीझन दोन मध्ये मिहिर विरानीच्या भूमिकेसाठी अमर उपाध्याय, हितेन तेजवानी आणि रोनित रॉय यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप एकता कपूरने याबाबत कोणताही खुलासा केला नाही आहे.

क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून स्मृती इराणी यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी तुलसी विरानी हे पात्र साकारले होते. या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहिला होता. अजूनही मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही आहे.

Share this article