Close

पूर्वीचा काळ आणि आताच्या काळातील तफावत, कृष्णधवल ते कलरफुल बदलत जाणारी टेक्नोलॉजी… मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत ( Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Share Post On Changes Of Technology)

आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध या भूमिकेमुळे अभिनेते मिलिंग गवळी लोकप्रिय झाले. ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. सेटवरचे अनुभव, गंमती जमती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी सेटवरील एका मित्राचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली.

त्यांनी लिहिले की, Thankyou @ashayrtulalwar खूप खूप आभारी आहे मी तुझा ,
सकाळी सकाळी लवकर उठून माझे फोटो काढल्याबद्दल धन्यवाद!
माझ्यामध्ये आणि आशय मध्ये एक common factor, एक समान आवड आहे, ती म्हणजे कृष्णधवल photos ची , black and white pictures ची , दोघांना हे कृष्णधवल चित्र फार फार आवडतात, आणि अशी चित्र काढण्याचा आशय चा हातखंड आहे, तो ते Photos फारच भारी काढतो,
मला सारखं असं वाटतं की काही बाबतीत तरी technology advance व्हायला नको होती , बघाना पूर्वी black and white त्या जमान्यामध्ये किती सुंदर सुंदर चित्रपट झाले आणि ते आजही तेवढेच मनामध्ये घर करून बसले आहेत , पूर्वीच्या हिरोइन्स चे जे black and white फोटोज इतक्या वर्षानंतर आजही खूप खूप सुंदर वाटतात , नूतन मधुबाला मीनाकुमारी नर्गिस, मराठीमध्ये जयश्री बाई गडकर, दुर्गा खोटे, सुलोचना दीदी, स्मिता पाटील .
आजही त्यांच्या सौंदर्याला matchच नाही आहे !
मुगल-ए-आजम चित्रपट तयार व्हायला बारा वर्षे लागली, के.असिफ यांनी हा चित्रपट सुरू केला त्या वेळेला ब्लॅक अँड व्हाईट जमाना होता, इतका भव्य दिव्य सिनेमा होता, भव्य दिव्य सेट होते, ते सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शुट झाले, पिक्चर संपता संपता रंगीत सिनेमाचा काळ सुरू झाला होता, मग के.आसीफ ने मोगल-ए-आजमचं एक गाणं “प्यार किया तो डरना क्या”कलर मध्ये शूट केलं, पण ते गाणं कलर मध्ये शूट केलं नसतं तरी सुद्धा मोगल-ए-आजमचं भव्य दिव्य आणि सौंदर्य कमी झालं नसतं, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मला असं वाटतं तो अधिक सुंदर दिसला आहे! 1953 मध्ये झाशीची राणी सौरभ मोदींनी पहिलं coloured पिक्चर तयार केलं.


मग त्यानंतर कोणी मागे वळून पाहिलंच नाही, फक्त कलर एके कलर चित्रपट आले, फोटोस पण आपण coloured काढायला लागलो.
पण मला आता असं वाटायला लागलं की झालं आपण आता कलर बिलर सगळं करून परत मागे वळून ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला जास्त आवडायला लागणार,
जसं बर्गर पिझ्झा पास्ता नूडल्स टाकोज नाचोज या सगळ्याची चव घेऊन झाली आहे आणि आता परत एकदा चुलीवरच्या भाकऱ्या, पिठलं किंवा एखादी मेथीची भाजी, एका बुक्कीत फोडलेला कांदा, लसणाची किंवा शेंगदाण्याची किंवा खुरसणीची चटणी किंवा मिरचीचा ठेचा.
याला जी चव आहे ना , ती जगातल्या कुठल्याच पदार्थाला नाही, तसंच ब्लॅक अँड व्हाईट फोटोज ला,पिक्चर ला जी मजा आहे ना ती कुठल्याही कलर Photo ला ,सिनेमाला नाही!
आपलं काय मत आहे या वर ? 

Share this article