आमिर खानची मुलगी इरा खान ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा ३ जानेवारी २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी इरानं नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली होती. आता ती नुपूरसोबत जानेवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.
सध्या इरा आणि नुपूर यांच्या घरी लग्नापुर्वीचे विधी सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी इराच्या केळवणाचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.
इरा खान-नुपूरच्या लग्नाला थोडेच दिवस शिल्लक आहेत. इराने आता तिच्या लग्नाची पत्रिका पाठवण्यास सुरुवात केली आहे. सध्या या दोघांच्या लग्न पत्रिकेने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. इराने तिच्या मैत्रिणींना पाठवलेल्या लग्नाच्या कार्डावरील प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत.
इरा खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाच्या पत्रिकेची झलक पाहायला मिळत आहे. इरा खान-नूपूर शिखरेची लग्नपत्रिका पाहून चाहतेही थोडे चक्रावले आहेत.
इराने आपल्या मित्रांना अनोख्या शैलीत लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवली आहेत. या लग्नपत्रिकेत एक कोडे पाठवले जे त्यांना कॅमेऱ्यासमोर सोडवायचे आहे. व्हिडिओ शेअर करत इराने एक लांबलचक नोटही लिहिली आहे.
आमिरची लेक इरा ३ जानेवारी २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आमिरने सांगितले होते की तिने ३ जानेवारी ही तिच्या लग्नाची तारीख निवडली कारण ती या तारखेला नुपूरसोबत डेटवर गेली होती.