Close

पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेईल अशा अभिषेक बच्चन आणि सैयामीच्या “घूमर”चा ट्रेलर प्रदर्शित ! (Abhishek Bachchans Ghoomar The Inspiring Sports Drama Trailer Out)

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा आगामी बहू चर्चित 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन, दिग्दर्शक आर. बाल्की आणि अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री सैयामी खेर यांच्या दमदार भूमिका "घूमर" मधून अनुभवयाला मिळणार आहेत. भारतातील क्रीडा चित्रपटांच्या यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे.

धुमर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले की, अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची भूमिका साकारत असून त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण येते. तो पॅराप्लेजिक खेळाडूला प्रशिक्षण देताना दिसतोय. या खेळाडूची भुमिका अभिनेत्री सैयामी खेर साकारणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत.

ट्रेलरची सुरुवात अभिषेक बच्चनच्या डायलॉगने होते, जो मद्यधुंद अवस्थेत दिसतो. सैयामी खेर जी अंगदच्या प्रेमात आहे. पण तिच्यासाठी क्रिकेट हे तिच्या प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात वादळ येते आणि एका अपघातात तिचा एक हात तिला गमवावा लागतो. त्यानंतर तिच्या संघर्षाची कहानी सुरु होते.

अमिताभ बच्चन यांनी मुलाच्या चित्रपटाचा ट्रेलर शेयर करत लिहिलं की, हा ट्रेलर मन हेलावणारा आहे.

ही कथा राहुल सेनगुप्ता आणि ऋषी वीरमानी यांच्यासोबत लिहिली आहे. हंगेरियन उजव्या हाताची नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून प्रेरित आहे, ज्यात तिच्या दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती.

आर बाल्की लिखित आणि दिग्दर्शित घूमरमध्ये अभिषेक बच्चन, अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शिवेंद्र सिंग आणि इनवाका दास हे या चित्रपटातून पदार्पण करत आहे. आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित "घूमर" १८ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

https://youtu.be/jzWBHYWICLM

"घूमर" च्या ट्रेलरने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट पुन्हा भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेणार असा विश्वास निर्मात्यांना आहे. "घूमर" हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट असून त्यांनी "चीनी कम," "पा," आणि "पॅड मॅन" सारख्या प्रशंसित चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं आहे. बहुप्रतीक्षित आर. बाल्की दिग्दर्शित "घूमर" या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच झाला आणि सोशल मीडिया वर या ट्रेलर ने तुफान लोकप्रियता मिळवली. मोठ्या संख्येने लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेयर तर केला पण विशेष म्हणजे सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, डेव्हिड वॉर्नर, रशीद खान, आणि अजिंक्य राणे आणि इतर बड्या क्रिकेटर्सनी हा ट्रेलर शेयर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this article