मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्या वर्गाला सुद्धा मोठा धक्का बसला. गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटत होते तेव्हाच त्याला अचानक अटॅक आल्याचे बोलले जाते. अभिनेत्याला तातडीने अंधेरी पश्चिम येथील बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस तळपदे त्याच्या आगामी वेलकम टू द जंगल या सिनेमाचे शूटिंग करत होता या चित्रपटात अक्षय कुमार सोबत अनेक कलाकार मंडळी आहेत. दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या श्रेयसला अचानक अस्वस्थ वाटू लागले. दिवसभरात त्याने ॲक्शन सिक्वेन्स शूट केले होते.
शूट झाल्यावर तो घरी आला आणि पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने सांगितले. तिने देखील तातडीने त्याला दवाखान्यात नेले पण वाटेत असताना चक्कर आली. रात्री दहाच्या सुमारास त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे म्हटले आहे.