डायरेक्ट टू होम अर्थात् डीटीएच उद्योगाचा पाया घालणाऱ्या डिश टीव्हीने आता मनोरंजन क्षेत्रात नवा पुढाकार घेतला आहे. ‘डिश टिव्ही स्मार्ट +’ या त्यांच्या नवीन सेवेचे उद्घाटन अभिनेत्री राधिका मदन हिच्या हस्ते करण्यात आले.
या सेवेमधून आता ग्राहकांना कोणत्याही स्क्रीनवर, कुठेही, टी.व्ही. आणि ओटीटी मंचावर सहज प्रवेश देण्यात आला आहे. तोही अतिरिक्त खर्च न करता. या सेवेमधून नवे तसेच विद्यमान ग्राहक, त्यांनी निवडलेल्या सबस्क्रीप्शन ॲपसह इतर लोकप्रिय ओटीटी ॲप्सचा आनंद घेऊ शकतील. “या सेवेद्वारे आम्ही आधुनिक भारतीय कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करत आहोत,” असे सीईओ मनोज डोयाल यांनी सांगितले.
या सेवेमुळे लाखो घरांमधून मनोरंजन वितरणाचे एक नवीन मानक स्थापित झाले आहे, असे समजायला हरकत नाही.