Close

मारामारीच्या व्हायरल व्हिडिओवर आदित्या नारायणच्या मॅनेजरचे स्पष्टीकरण, म्हणाला- तीच व्यक्ती….. (Aditya Narayan Manager Gives Explanation On Viral Video)

आदित्यचा कॉन्सर्टमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटातील एक गाणे गात असताना प्रेक्षकांमधील एका चाहत्याकडे पाहिले आणि मग त्याच्या हातातून फोन काढून फेकून दिला. यानंतर लोकांनी आदित्यावर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली.

 छत्तीसगडमधील भिलाई येथील एका महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी घटना घडली. मात्र आता गायकाच्या इव्हेंट मॅनेजरने घडल्या प्रकारावर स्पष्टीकरण देत ती व्यक्ती कॉलेजची विद्यार्थी नसल्याचे सांगितले आहे. इव्हेंट मॅनेजर म्हणाला, 'तो मुलगा कॉलेजचा विद्यार्थीही नव्हता. तो कॉलेजच्या बाहेरचा कुणीतरी असावा. तो सतत आदित्यचे पाय ओढत होता. यामुळे आदित्य खूपच अस्वस्थ होत होता.

 त्या व्यक्तीने आपला फोनही आदित्यच्या पायावर फेकला होता. त्यानंतरच गायकाच्या राचा पारा चढला. या घटनेशिवाय संपूर्ण कॉन्सर्ट सुरळीत पार पडला. या घटनेनंतरही हा कार्यक्रम दोन तास चालला. जर आदित्य चुकीचा असेल आणि विद्यार्थी बरोबर असता तर त्याने पुढे येऊन आपली बाजू मांडली असती पण तसे झाले नाही.

इव्हेंट मॅनेजरने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'अशा प्रकारची कृत्ये प्रत्येक शहरात घडत असल्याने दर्शन रावल यांनीही अशा कॉलेजांमध्ये कॉन्सर्ट करणे बंद केले आहे. प्रत्येक गोष्टीमागील सत्य लोकांना कळत नाही. फक्त एक बाजू दिसते. व्हिडिओमध्ये पाहिलं तर ती व्यक्ती आदित्यला सतत मारत होती आणि ओढत होती. तो पडला असता तर काय झाले असते? हा मुलगा बरोबर असता तर त्याने पुढे येऊन आपल्यासोबत हा प्रकार घडल्याचे कॉलेज प्रशासनाला सांगितले असते. ‘मी अनेक वर्षांपासून कॉलेजशी निगडीत कामकाज पाहत आहे आणि त्यांनी याआधी एवढी चांगले कॉन्सर्ट कधीच केले नव्हते.’ असे आदित्यनेही सांगितले आहे.

Share this article