Close

लग्नाच्या महिन्याभराने आशिष विद्यार्थी पत्नीसोबत लुटतायत सुट्टीचा आनंद (After A Month Of Marriage, Ashish Vidyarthi Is Enjoying The Holiday With His Wife)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे या अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आणि आता आशिष विद्यार्थीनी आपल्या इंस्टाग्रामवर लग्नानंतरचा आनंदी फोटो शेअर केला आहे. या आनंदी फोटोमध्ये त्यांची पत्नी रुपाली बरुआही अभिनेत्यासोबत आहे.

अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी गेल्या महिन्यात आसाममधील फॅशन डिझायनरसोबत लग्न केले आहे. मात्र, या वयात 57 वर्षीय आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्न केल्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी टीका केली. लग्नानंतर काही दिवसांनी आशिष पत्नी रुपालीसोबत हनिमूनला गेले आहेत.

आशिष विद्यार्थ्यानी पत्नी रुपालीसोबतचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आशिष आणि रुपाली दोघेही कॅज्युअल पोशाख परिधान करून बसमध्ये बसलेले दिसत आहेत. दोघेही हसत हसत पोज देत आहेत. लोकेशनची माहिती न देता हा फोटो शेअर करत आशिषने कॅप्शन लिहिले - धन्यवाद प्रिय मित्रांनो. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी. अलशुक्रन बंधूंनो... अलशुक्रन जीवन! हा सुंदर फोटो टिपल्याबद्दल टिनटिनचे आभार.

अभिनत्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते त्यांच्या या फोटोवर आपले प्रेम दाखवत आहेत. वयाच्या या टप्प्यावर नवीन सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे. हा फोटो पाहून काही चाहते सिंगापूरमध्ये सुट्टी घालवत असल्याचा अंदाज लावत आहेत. एका चाहत्याने लिहिले- सिंगापूरमध्ये आपले स्वागत आहे. आपण भेटू शकू अशी आशा आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने आपला आनंद व्यक्त करत लिहिले- "अरे हे खूप क्यूट आहेत सर. खूप आवडले. नवविवाहित जोडप्याच्या या गोंडस फोटोवर अनेक चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी पाठवले आहेत.

Share this article