Close

अक्षय कुमारला मिळाले भारतीय नागरिकत्व, स्वातंत्र्य दिनादिवशीच चाहत्यांना दिली गुडन्यूज (Akshay Kumar finally gets Indian citizenship)

स्वातंत्र्यदिन अक्षय कुमारसाठी खूप खास ठरला. 15 ऑगस्ट रोजी खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांसह एक मोठी बातमी शेअर केली. अखेर अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. काल स्वातंत्र्यदिनी त्यांने ही गोड बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोल केले होते. स्ट्रगलच्या दिवसांत अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व घेतल्याचे अनेकवेळा सांगितले जाते. सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. लोक त्याला कॅनेडियन कुमार म्हणायचे. अशा परिस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळाल्याने अभिनेता खूप आनंदी आहे. याबद्दल त्याचे चाहतेही खूप खुश असून सोशल मीडियावर अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत.

रिपोर्टनुसार, अक्षय कुमार अनेक दिवसांपासून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. कारण त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते. आता ते मिळाला असून, आज देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना अक्षयने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. या अभिनेत्याने भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा दाखलाही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांनी कागदपत्रांची एक प्रत शेअर केली आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लिहिल्या.

त्यावर लिहिले आहे- "हृदय आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्थानी आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद."

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारचे चाहतेही खूश झाले असून, त्याच्या पोस्टवर कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे – शेवटी द्वेष करणाऱ्यांनी बोलणे बंद केले आहे, तर एका वापरकर्त्याने म्हटले आहे – भारतीय बनल्याबद्दल अनेक अभिनंदन, शक्य असल्यास, कॅनडालाही तुमच्या हृदयातून काढून टाका.

लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून त्याला ट्रोल करताना त्याच्या चित्रपटांना टार्गेट करायचे. लोक म्हणायचे - तू भारतात काम करतो. येथे पैसे कमवतो. पण तुझ्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अभिनेत्याने अनेकदा स्पष्टीकरण दिले होते आणि सांगितले होते की त्याचे हृदय भारतीय आहे. जेव्हा त्यांचे चित्रपट चालत नव्हते, काम मिळत नव्हते तेव्हा त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले होते. पण जेव्हा त्यांना पुन्हा काम मिळू लागले तेव्हा त्यांनी भारतीय नागरिकत्व परत मिळण्यासाठी अर्ज केला. अक्षय म्हणाला की, "भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे, मी जे काही कमावलं आहे, जे काही मिळालं ते इथूनच आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा लोक काहीही नकळत काहीही बोलतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं. .

Share this article