लोकप्रिय टीव्ही अभिनेता, संगीतकार, अँकर 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता अली मर्चंट तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. 'लॉक अप' आणि 'बिग बॉस' सारख्या रिअॅलिटी शोचा भाग असलेल्या अली मर्चंटने 2 नोव्हेंबर रोजी त्याची गर्लफ्रेंड अंदलिबसोबत लग्न केले. गेल्या अनेक दिवसांपासून तो तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होता. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.
38 वर्षीय अलीने 2 नोव्हेंबर रोजी लखनऊमध्ये अंदलीब जैदीशी लग्न केले. या जोडप्याचे लग्न पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडले. अली आणि अंदलिबचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र लग्नाला उपस्थित होते.
आता, लग्नाच्या एका दिवसानंतर, अलीने सोशल मीडियावर लग्नाची छायाचित्रे शेअर आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या जीवन साथीदारासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अलीने लिहिले की, "आणि आता आम्ही कायमचे एकत्र, आनंदी राहू शकतो."
लूकबद्दल बोलायचे तर, अली आणि अंदलिब त्यांच्या लग्नात बेज आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसले, ज्यामध्ये ते खूप सुंदर दिसत होते. अलीने फुलांचा सेहरा असलेली बेज आणि सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती, तर अंदलिबने देखील अलीसोबत मॅचिंग असलेला बेज रंगाचा लग्नाचा पोशाख परिधान केला होता.
अली आणि अंदलिबच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचवेळी, काहीजण त्याला तिसरे लग्न किती काळ टिकेल यावरही ट्रोल करत आहेत.
अली मर्चंट आणि मॉडेल अंदलीब यांची भेट एका फॅशन शोदरम्यान झाली होती. अलीने काही काळापूर्वीच आपले नाते अधिकृत केले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बुर्ज खलिफासमोरील यॉटमध्ये प्रपोज केले होते.
अली मर्चंटचे हे तिसरे लग्न आहे. याआधी त्यांनी दोन लग्ने केली होती. त्यांचे पहिले लग्न अभिनेत्री सारासोबत झाले होते, जे दोन महिनेही टिकले नाही. यानंतर अलीने अनम मर्चंटशी लग्न केले, पण पाच वर्षांनी तिला घटस्फोट दिला.
अली मर्चंट विक्रम बेताल की रहस्य गाथा, बंदिनी, आहट आणि शपथ यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसला आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याने स्वतःला टीव्हीपासून दूर केले आहे आणि वेब शोवर लक्ष केंद्रित केले आहे.