बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा हॅपी फोटो शेअर केला आहे, या फोटोत तिच्यासोबत करण जोहर आणि रणवीर सिंह आहेत. हा सुंदर फोटो शेअर करत आलिया भट्टने तिचा नुकताच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला ग्रँड ओपनिंग दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रणवीर आणि आलियाच्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची चांगली ओपनिंग पाहून अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा सहकलाकार रणवीर सिंह आणि दिग्दर्शक करण जोहर दिसत आहे. आलिया आणि रणवीर पांढऱ्या पोशाखात आहेत. तर करण त्यांच्या मागे ऑरेंज टी-शर्टमध्ये घालून उभा आहे. तिघेही कॅमेऱ्यासमोर एकमेकांचा हात धरून हसत आहेत.
या फोटोसोबत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले - लव है तो सब है!! या चित्रपटाला इतके प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार... लव्ह, रॉकी, रानी आणि या कथेचे निर्माते. शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.