नुकतेच अयोध्या येथील राम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक कलाकार आणि इतर मान्यवर अयोध्येत दाखल झाले होते. अभिनेत्री आलिया भट्ट देखील पती रणबीर कपूरसह प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी आली होती.
यावेळी आलियाच्या साडीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलियाने निळ्या रंगाची साडी नेसली होती. दरम्यान आलियाची ही साडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती.
आलियाची साडी चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे या साडीच्या पदरावर रेखाटण्यात आलेली रामायणाची कथा. ही चित्रे कारागिरांनी स्वतः आपल्या हातांनी रेखाटली आहे. आज आपण या साडीबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
आलियाच्या या साडीवर सोनेरी रंगाची बॉर्डर आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठीच आलियाने खास ही साडी बनवून घेतली होती. या साडीच्या पदरावर अतिशय बारीक कारागिरी करण्यात आली आहे. पदरावर हातानेच रामायणातील काही दृश्य रेखाटण्यात आली आहेत.
माधुर्य क्रिएशनने ही साडी तयार केली आहे. हा ब्रँड अशा प्रकारच्या साड्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या साडीच्या पदरावर राजा दशरथ, सोनेरी हरिण, सीता अपहरण, हनुमानने सीता मातेला अंगठी दिली यांसारखे अनेक दृश्य रेखाटण्यात आले आहेत.
कारागिरांनी स्वतःच्या हाताने ही दृश्य रेखाटली असून ही दृश्य पारंपरिक ‘पट्टीचित्र’ शैलीमध्ये तयार करण्यात आली आहेत.आलियाच्या या मैसूर सिल्क साडीवर दोन कारागिरांनी म्हणत केली असून ही कारागिरी करण्यासाठी सुमारे १०० तास लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही मीडिया अहवालानुसार या साडीची किंमत ४५ हजार इतकी आहे.
(Photos: Ami Patel/Instagram)