Close

ही कसली फॅशन म्हणत रणबीर आलिया झाले ट्रोल…( Alia -Ranbir Brutally Trolled For Their WEIRD Fashion Choice At ‘RARKPK’ Premiere)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही फॅशनेबल दिसण्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. पण यावेळी 'रॉकी और रानी की प्रेम की कहानी'च्या प्रीमियरला पोहोचलेले आलिया आणि रणबीर त्यांच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे.

आलिया भट्टच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे स्क्रिनिंग पाहण्यासाठी हे जोडपे मुंबईतील एका सिनेमागृहात गेले होते. रेड कार्पेटवर दोघांच्या क्यूट केमिस्ट्रीने सगळ्यांची मनं जिंकली. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या आलिया आणि रणबीरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने हसतमुखाने बाहेर उभे राहून मीडियाला पोज दिली.

यादरम्यान आलिया आणि रणबीर कपूर काळ्या स्वेटशर्टमध्ये ट्विनिंग करताना दिसत होते. आलिया भट्टने काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह स्वेटशर्ट परिधान केला होता. ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. स्वेटशर्टला पॅच आणि स्ट्रिंग जोडलेले होते. अभिनेत्रीने स्वेटशर्टसह बॅगी जीन्स घातली होती. आलियाने मेकअप, गोल्डन हूप्स, ब्लॅक गुच्ची हील्स आणि मोकळ्या केसांनी लूकला पूरक केले.

दुसरीकडे, अभिनेत्रीचा पती रणबीर कपूर काळ्या स्वेट शर्ट, काळी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये देखणा दिसत होता. सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने पसरत आहेत. या जोडप्याच्या फोटोंवर नेटिझन्स त्यांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया देत आहेत. स्वेटशर्टवर पॅचसोबत लटकलेल्या नाड्याकडे पाहून एका यूजरने आलियाची खिल्ली उडवली आणि विचारले की हा कसला नाडा आहे.

दुसर्या  यूजरने लिहिले - माझ्या टी-शर्टवर माझे नाव छापले आहे. पण त्या बाळाच्या डायपरवर लटकणाऱ्या नाड्याचे काय झाले? अनेक चाहत्यांना आलियाची ही स्टाइल आवडली नाही आणि त्यांनी आलिया भट्टवर ही कसली फॅशन अशी कमेंट केली आहे.

फॅशनच्या बाबतीतही लूक खूपच खराब आहे. त्या नाड्या खूप विचित्र दिसत आहेत आणि विशेषत: रणबीरवर अगदीच विचित्र वाटत आहे.

Share this article