Close

कहो ना प्यार है मधून करीना कपूरची झालेली हकालपट्टी, अमीषा पटेलने सत्य केलं उघड (Ameesha Patel Revelad real reason behind Kareena Kapoor’s Eviction from ‘Kaho Naa Pyaar Hai’)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर 2' साठी चर्चेत आहे. त्याचवेळी 20 वर्षांनंतर तारा सिंग आणि सकिना यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहताना चाहत्यांच्या आनंदाला उरलेला नाही. हा चित्रपट सातत्याने यशाचे नवे विक्रम करत आहे. या चित्रपटामुळे सतत चर्चेत असलेल्या अमिषा पटेलने नुकताच तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला असून करीना कपूरला 'कहो ना प्यार है' चित्रपटातून वगळण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.

अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे की तिला 'कहो ना प्यार है' चित्रपटात करीना कपूर खानच्या जागी कशी देण्यात आलेली. अमीषाने सांगितले की, पहिल्या चित्रपटात करीना कपूरला हृतिक रोशनसोबत कास्ट करण्यात आले होते आणि चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते.

मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यात काही गोष्टीवरून भांडण झाले, त्यानंतर राकेश रोशनने करीनाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि करिनाच्या ऐवजी तिला चित्रपटासाठी साइन केले.

अमीषाने पुढे सांगितले की, राकेश रोशनची पत्नी पिंकी हिने तिच्यासोबत शेअर केले होते की, चित्रपटाचे शूटिंग मध्यंतरी थांबल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. हा हृतिकचा डेब्यू चित्रपट होता, ज्यावर करोडो रुपये पणाला लागले होते. अशा परिस्थितीत राकेशजी खूप अस्वस्थ झाले होते आणि नवीन नायिका कुठून आणावी हे त्यांना समजत नव्हते.

अमीषाला पिंकी आंटी म्हणजेच राकेश रोशन यांच्या पत्नीने सांगितले की एके दिवशी राकेश रोशन यांनी तिला लग्नात पाहिले आणि तिला पाहताच त्यांनी चित्रपटासाठी अभिनेत्रीला फायनल केले. अभिनेत्री म्हणाली की ते रात्री झोपू शकले नाही कारण त्यांना फक्त भीती होती की मी चित्रपट करण्यास नकार देईन, परंतु मी हो म्हणाले आणि अशा प्रकारे मला माझा पहिला चित्रपट मिळाला.

अभिनेत्रीने पुढे सांगितले की ती राकेश रोशनच्या अपेक्षांवर खरी उतरली आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि अमिषा पटेल रातोरात स्टार बनली. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Share this article