Close

चाहत्यांना भेटण्यासाठी दर रविवारी अमिताभ बच्चन जलसामधून अनवाणी पायांनी बाहेर पडतात, आता बिग बींनीच सांगितलं यामागचं कारण… (Amitabh Bachchan goes bare feet to meet fans, Now Big B reveals the reason behind this, says ‘My well wishers on Sunday are my temple’)

अमिताभ बच्चन यांना उगीचच शतकातील सुपरहिरो म्हटलं जात नाही. त्यांचे प्रचंड चाहते आहेत. असंख्य लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्यासाठी कोणताही त्याग करायला ते तयार असतात. बिग बी देखील त्यांच्या चाहत्यांना तितकेच प्रेम आणि आदर देतात. बिग बींनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की जर चाहते त्यांना देवाचा दर्जा देतात तर ते देखील चाहत्यांना देवापेक्षा कमी मानत नाहीत.

दर रविवारी देशभरातून लाखो लोक बिग बींची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या जलसा बंगल्यासमोर जमतात. बिग बी देखील दर रविवारी चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या सुपरहिरोची झलक पाहायला मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धन्यता वाटते. रविवारी चाहत्यांना भेटण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे बिग बी चाहत्यांना अभिवादन करताना अनवाणी असतात. आता कित्येक वर्षांनंतर बिग बींनी याचं कारण दिलं आहे आणि हे कारण इतकं गोड आहे की तुमचं बिग बींवरील प्रेम आणखीनच वाढेल.

खरं तर, बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अमिताभ बच्चन यांच्या रविवारच्या भेटीचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये ते अनवाणी दिसत आहेत. यासोबतच अमिताभ यांनी त्याचे सुंदर कारणही दिले आहे. बिग बी यांनी लिहिलंय, "मला नेहमी विचारलं जातं की 'चाहत्यांना कोण अनवाणी भेटायला जातं'? मी त्यांना सांगतो, 'मी जातो.... तुम्ही अनवाणी मंदिरात जा.... माझे हितचिंतक रविवारी येतात' ते माझ्यासाठी मंदिरासारखे आहेत.!! तुम्हाला यात काही अडचण आहे का!"

अमिताभ यांच्या या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत, हे उघड आहे. त्यांच्या या पोस्टवर यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले- 'केवळ तुम्हीच हे सांगू शकता', दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'अमित जी, तुमची शब्दांची निवड किती अप्रतिम आहे, तुम्ही तुमच्या प्रियजनांना डोक्यावर बसवता. तुमचा हा गुण मन जिंकतो. आणखी एका यूजरने लिहिले की, 'जोपर्यंत सिनेमा आहे, अमिताभ बच्चन आहे.'

याशिवाय बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवर संडे मीटचे अनेक फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या चाहत्यांची त्यांच्याबद्दलची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते.

Share this article