बिग बॉस १७ च्या घरात सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरुन सतत वाद होतच असतता. यावेळी या शोमध्ये पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या नवऱ्यासोबत सहभागी झाली आहे. पण दोन महिने एकत्र राहिल्यानंतर या दोघांमध्ये त्यांच्या नात्याबाबत वाद सुरू आहे. अशातच अंकिताने घटस्फोटाची मागणीही केली. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
'बिग बॉस १७' च्या एका एपिसोडमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात भांडण झाले. विकी आणि वाईल्ड कार्ड आलेली आयशा खान "विवाहित लोक खूप त्रासातून जातात" असे म्हणत होते. ही गोष्ट अंकिताच्या कानावर पडली तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले. या संभाषणामुळे अंकिता चिडली आणि तिने विकीला घटस्फोट हवा आहे का असा प्रश्न केला.
आयशाने विकीला वैवाहिक जीवनाविषयी विचारले तेव्हा विकीने गंमतीने उत्तर दिले की, “मला कसे वाटते हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक, विशेषत: पुरुष अशाच परिस्थितीतून जातात. ते खरोखर कशातून जात आहेत आणि त्यांना काय त्रास होतो हे ते स्पष्ट करू शकत नाहीत."
यावर विकीला प्रत्युत्तर देताना अंकिता म्हणाली, 'तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचे नाही. आयशाशी बोलताना ती म्हणाली, “विकी माझ्यावर प्रेम करतो पण मला जे हवे आहे ते तो देत नाही. कधीकधी मला तो जबरदस्ती वागत असल्यासारखे वाटते.”
त्यामुळे अंकिता घरात हे फक्त रागात बोलली की मनापासून याची चिंता तिच्या चाहत्यांना लागली आहे.