काही दिवसांपूर्वी भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकरच्या फोटोंवरुन त्यांच्यात काहीतरी अफेअर सुरु असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता अनुषाने भूषणसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की,
, “आज मला एका खास सहकलाकाराचे आभार मानायचे आहेत, ज्याने प्रत्येक पावलावर माझी मदत केलीय, मला धीर देलाय. प्रोफेशनल असूनही त्याने मला उत्तम काम करण्यासाठी नेहमीच वेळ दिला आहे.”
“सेटवर बाकीच्यां इतकं आत्मविश्वासू नसणं हे खूप भीतीदायक असतं. पण जेव्हा तुमच्याकडे अशी व्यक्ती असते जी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असेल, तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तो सगळा प्रवास तुमच्यासाठी किती सोप्पा होऊन जातो. जेव्हा ते स्वत: उत्तम कलाकार असतात, पण ते तुम्हाला कधीच त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाहीत; ही गोष्ट खरंच खूप मोठी असते आणि यासाठी धन्यवाद भूषण. माझा उत्तम सहकलाकार बनल्याबद्दल तुझे खूप आभार”,
“भूषण तू मला खूप काही शिकवलंस. मी तुझी सदैव कृतज्ञ राहीन. शूटिंगदरम्यान मला शब्द उच्चारण्यात अडचण येत होती, तेव्हा मी माझे डायलॉग्स पुन्हा पुन्हा बोलत होते, त्यावेळी तू कधीच माझ्यावर हसला नाहीस. त्याऐवजी मी ते बरोबर बोलीन यासाठी तू मला जास्त वेळ दिलास.”
“या चित्रपटानंतरही जेव्हा तू दुसर्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतास तेव्हा तू मला माझ्या प्रत्येक डायलॉगच्या व्हॉईस नोट्स पाठवल्यास, जेणेकरुन मी माझं डबिंग उत्तमरित्या करू शकेन. खूप खूप धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!”