बालिका वधू या मालिकेतून छोट्या आनंदीने घराघरात अशी ओळख निर्माण केली होती. ती आजही आनंदी या नावानेच ओळखली जाते. पण आता ही छोटी आनंदी म्हणजेच अविका गौर मोठी झाली आहे आणि लवकरच बॉलीवूड चित्रपट 1920: हॉरर्स ऑफ द हार्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अविकाने खुलासा केला की, किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून तिला एका रात्रीत बदलण्यात आले होते. तिने चित्रपट सोडला नसून बाहेर काढण्यात आल्याचेही अविकाने स्पष्ट केले. अभिनेत्री म्हणाली की सर्वकाही झाले होते. पेपर वर्क सुद्धा फायनल झाले होते, फक्त साइनिंग बाकी होती, पण नंतर तिला फोन आला आणि सांगण्यात आले की तिच्या जागी आणखी कोणालातरी या चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे.
अविका म्हणते की हे का घडले हे मला माहित नाही, परंतु मला असे वाटते की ते होऊ शकते, कारण अंतिम: द फायनल ट्रुथ या चित्रपटादरम्यान सुद्धा नेमके असेच घडले होते. या चित्रपटातून तिला एका रात्रीत बदलण्यात आलेले.
अविका म्हणाली की तिला याचा पश्चात्ताप होत नाही कारण त्यांच्याकडे स्वतःचे कारण असेल जे त्यांनाच चांगले माहित आहे. पण हो, हे दुस-यांदा घडले म्हणून मी दु:खी होते, त्यामुळे मला असे वाटले की हे दुस-यांदा घडायला नको होते.
मलाही भावना आहेत, शेवटी मी माणूसच आहे. पण तेही त्यांच्या जागी बरोबर आहेत. मी त्यांना चुकीचे म्हणत नाही, कारण भूमिकेसाठी कोण चांगले आणि योग्य असेल हे देखील त्यांनाच ठरवायचे आहे, कास्टिंगबाबत ते स्वतःच निर्णय घेतात, कारण कोणती भूमिका चांगली आहे हे त्यांना हुशारीने निवडायचे आहे. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत.