अलीकडे, अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पलक तिवारी यांनी वेगवेगळ्या अँगल ने त्यांची छायाचित्रे क्लिक केल्याबद्दल पापाराझींना फटकारले होते आता, आयशा खानने फोटोग्राफर्सना थोडा शिष्टाचार शिकवला आहे. आयशाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक लांबलचक नोट पोस्ट करत काही पापाराझींच्या विचित्र वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगलने, विशेषत: मागून फोटो क्लिक करतात याचा तिला राग आला आणि तिला याचं खूप वाईट वाटलं.
आयशा खानने इंस्टाग्रामवर लिहिले, 'हे कोणते अँगल आहेत? तुम्ही कुठे झूम करत आहात? काही माध्यमांना का कळत नाही? कुणी आपल्याला कुठून आणि कुठल्या अँगल पकडेल या भीतीपोटी स्त्री तिच्या इच्छेनुसार कपडे घालू शकत नाही का? त्यांनी पुढे लिहिले की, 'एक महिला कारमधून उतरण्यापूर्वी तिचा ड्रेस ॲडजस्ट करत आहे आणि तुम्हाला तो क्षण टिपायचा आहे, एक महिला म्हणत आहे की मागून घेऊ नका. बाय! आपल्या काही मीडिया चॅनल्सना शिष्टाचार शिकण्याची गरज आहे.
काही काळापूर्वी आयशाने 'हॉटरफ्लाय'शी संवाद साधत पापाराझी संस्कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, 'जेव्हा आपण मीडियाबद्दल बोलतो तेव्हा मला याचा अनुभव आला, ते तुम्हाला कसे क्लिक करत आहेत? ते शरीराचा भाग झूम करत आहेत, तुमच्या मागे येत आहेत, थोडी जरी चूक झाली तर ते पकडायला तयार असतात. माध्यम म्हणून त्यांनी त्याचा आदर करून त्याला स्थान दिले पाहिजे. मला माहित नाही काय चूक होत आहे, अलीकडे, मी एका अभिनेत्रीला पाहत होते तिने फोटोग्राफर्सना सांगितले की 'तुम्हाला जे हवे तेच फोटोत दाखवाल', माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझे फोटो काढू शकत नाही. तुम्ही माझ्यावर क्लिक केल्यास ठीक आहे, पण अँगलवर झूम वाढवणे चुकीचे आहे.
काही दिवसांपूर्वीच मृणाल ठाकूरलाही एका कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोज देताना पापाराझींनी स्पॉट केले होते. जेव्हा छायाचित्रकारांनी तिला पाठीमागे त्यांच्याकडे पोज देण्यास सांगितले तेव्हा मृणालने नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी पलक तिवारीनेही फोटोग्राफर्सना अशीच विनंती केली होती.