राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, उद्घाटन सोहळ्याला खास पाहुणे येणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक संत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी, निर्माता महावीर जैन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.
याशिवाय रामायण मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यासोबतच या यादीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, अजय देवगण, सनी देओल, चिरंजीवी, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ, प्रभास, धनुष, मोहनलाल, यश इत्यादी अनेक स्टार्सच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय स्वामी रामदेव, दलाई लामा, मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानी, आशा भोसले, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, कारसेवक यांच्यासह सुमारे ४ हजार संतांसह एकूण ७,००० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच देशासाठी आपले प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित केले आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधीच निमंत्रित करण्यात आले असून या शुभप्रसंगी अनेक ट्रस्ट आणि धार्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार त्यांनी 10,000-15,000 लोकांसाठी जागा तयार केली आहे.