Close

शाहरुखसोबत केलेला तो शो करिअरमधला सगळ्यात मोठा फ्लॉप होता! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्रीचे स्पष्ट विधान ( Bhabhi Ji Ghar Per Hai Fame Saumya Tondon Says Her Show With Shah Rukh Khan Was Big Flop)

शाहरुखसोबत काम करण्यासाठी सर्वच कलाकार आतुर असतात. पण टीव्हीवरील एका अभिनेत्रीने शाहरुख खानसोबतचा शो फ्लॉप झाल्याचे म्हटले आहे.     

  टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनने शाहरुखसोबत रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. पण तिच्या मते हा शो तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप शो होता. 'भाभीजी घर पर हैं' या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेतील अनिता भाभी या पात्रासाठी सौम्या टंडन लोकप्रिय आहे. तिने 'जब वी मेट' चित्रपटातील रूप ढिल्लन हे पात्र साकारले होते. सौम्याने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत 'जोर का झटका: टोटल वाइपआउट' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनही केले होते.

'डिजिटल कॉमेंटरी'शी बोलताना अभिनेत्री सांगितले की, जेव्हा मला कळले की मी शाहरुख खानसोबत शो होस्ट करणार आहे, तेव्हा मला माझे करिअर सेट झाले असे वाटले होते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे तो शो चालला नाही. 'हा शो माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप होता.'

सौम्या पुढे म्हणाली की, ‘’मी शाहरुख खानसोबत त्यावेळी मी खूप वेळ घालवला. 'मला त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. तो सुद्धा अतिशय हुशार आहे. केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर तो खूप समजुतदार देखील आहे. हा शो करण्यापूर्वी मी त्याची फार मोठी चाहती नव्हती. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. जेव्हा मी त्याच्यासोबत तो शो करत होती तेव्हा शाहरुख माझा खूप आदर करायचा. मी या क्षेत्रात नवीन आहे अस त्याने मला कधीच वाटू दिले नाही.''

Share this article