Close

भारती सिंहने आपल्या आईसाठी उचलले नवे पाऊल, स्वप्नाच्या दिशेने नवी वाटचाल (Bharti Singh rents a new apartment in her society for her mom and sister)

लाफ्टर क्वीन आणि लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. पण आता तिने सर्व परिस्थितीवर मात केली आहे. असे असले तरी आजही ती जुने दिवस विसरलेली नाही . ती तिच्या रोजच्या व्लॉग्समध्ये अनेकदा याचा उल्लेख करते. ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर करत असते. व्लॉगमध्ये भारतीने सांगितले आहे की, तिचे माहेर आणि सासरचे घर एकाच इमारतीत असण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

भारती सिंह तिच्या कुटुंबाचे खूप संरक्षण करते. तिचेही तिच्या आई आणि बहिणीवर खूप प्रेम आहे. ती आपल्या आई आणि बहिणीला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिने आता आपल्याच इमारतीत आई आणि बहिणीसाठी घर घेतले आहे. अलीकडेच भारती सिंहने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले की, मालाडला जायला तिला खूप त्रास व्हायचा . कामामुळे तिला अनेकदा आईला भेटता येत नव्हते. तिची आईलाही अमृतसर, मालाड आणि ती राहत असलेल्या तिच्या घरी ये-जा करावी लागायची. त्यामुळे आता तिने तिच्या स्वतःच्या इमारतीत आई आणि बहिणीसाठी भाड्याने एक अपार्टमेंट घेतले आहे. तिच्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.

भारती सिंहने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले की, "सतत प्रवासामुळे आई आजारी पडायची. मी देखील कामामुळे तिला अनेकदा भेटू शकत नव्हते. माझ्या सासूबाईंनी मला आमच्या सोसायटीत एक अपार्टमेंट भाड्याने घेण्याचा सल्ला दिला. मला ते आवडले.शेवटी, मी माझ्या आई आणि बहिणीसाठी एक नवीन अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. हे माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मला नेहमीच माझ्या सासरचे आणि माहेरचे घर एकाच इमारतीत हवे होते आणि अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. "ती या घरात शिफ्ट होण्यापूर्वी मी आज एक छोटीशी पूजा ठेवली."

भारतीने व्लॉगमध्ये दाखवले की तिचा नवीन फ्लॅट तिच्या घराशेजारी आहे. आता ती तिच्या आईची अधिक काळजी घेण्यास सक्षम असेल आणि तिच्यासोबत जास्त वेळ घालवू शकेल.

भारतीच्या या पावलाचे तिचे चाहते कौतुक करत आहेत आणि इतकं यश मिळवूनही ती आपल्या आईबद्दल एवढा विचार करते याचं कौतुक करत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/