Close

एकता कपूरच्या ‘नागिन ७’ मध्ये अंकिता लोखंडेची एन्ट्री निश्चित…? (Bigg Boss -17 Fame Ankita Lokhande Breaks Silence On Entry In Naagin-7 And Talks About Upcoming Project)

सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस १७ मधून बाहेर आल्यानंतर अंकिता लोखंडेचे नशीब उजळले आहे. अभिनेत्रीच्या हातात एकापेक्षा एक प्रोजेक्ट येत आहेत. शो संपल्यानंतर लगेचच अंकिता लोखंडेने 'स्वातंत्र वीर सावरकर' हा चित्रपट साइन केला. या चित्रपटात ती रणदीप हुड्डासोबत काम करणार असून ही माहिती स्वत: अंकिता लोखंडेने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिली आहे. या चित्रपटाशिवाय एकता कपूरच्या 'नागिन ७' या मालिकेमध्येही अंकिताची एन्ट्री निश्चित झाली असल्याचा दावा केला जात आहे. आता अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच या बातम्यांवर मौन सोडले आहे.

वास्तविक अंकिता लोखंडेने एका मुलाखतीमध्ये विकी जैनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीत अंकिता लोखंडेली ती नागिन ७ मध्ये दिसणार आहे का? असे विचारण्यात आले होते. त्यावर अंकिता लोखंडेने थेट 'नाही' असे उत्तर दिले. अंकिता म्हणाली, 'मी ही मालिका करत नाहीये. सध्या फक्त चित्रपटावर काम सुरू आहे. वीर सावरकर मार्चमध्ये प्रदर्शित होत आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे कारण बिग बॉस नंतरचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. बिग बॉस दरम्यान मी माझा अभिनय, लाईट, कॅमेरा, ॲक्शन यासारख्या गोष्टी मिस करत होते. अंकिता लोखंडेने नक्कीच नकार दिला आहे, परंतु चाहते अद्याप अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

काही मीडिया रिपोर्टनुसार एकता कपूरची लवकरच 'नागिन ७' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप मालिकेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकतंच फिल्मीबिटने दिलेल्या वृत्तानुसार, एकता कपूरने तिच्या 'नागिन ७' या आगामी शोमध्ये अंकिता लोखंडेला कास्ट केले आहे. यापूर्वीही एकताने तेजस्वी प्रकाशची निवड बिग बॉसच्या घरातूनच केली होती. अंकिता लोखंडेप्रमाणेच बिग बॉस १७ चा फर्स्ट रनर अप अभिषेक कुमारचे नाव देखील मुख्य अभिनेता म्हणून समोर येत आहे. तो अंकिता लोखंडेसोबत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. दोघेही एकत्र काम करतील. काही रिपोर्ट्समध्ये अंकित गुप्ताचे नावही आले आहे. अशा परिस्थितीत आता अंकिता, अभिषेक आणि अंकित यांच्यापैकी कोण नागिन ७ चा भाग बनणार हे चाहत्यांना बघायचे आहे.

Share this article