किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा त्यांनी त्यांच्या पोस्टमधून उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे. लोकसभा निवडणूकीचा नुकताच निकाल लागला. त्यात उद्धव ठाकरेंना घवघवीत यश मिळाले. आता ठाकरेंनी किरण मानेना कौतुकाची थाप दिली आहे.
‘’फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिन्टांपुर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड कॉल्स येऊन पडलेवते ! नंतर 'जय महाराष्ट्र' असा मेसेज येऊन पडला होता. मी कॉलबॅक केला... उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली...’’
"किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम." उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खुप काही बोलत होते... माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू... शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली...
भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद ‘’