बिग बॉस १७ चा महाअंतिम सोहळा येत्या २८ जानेवारीला रंगणार आहे. हा सो सुरु झाल्यापासून सतत चर्चेत होता. यंदा अनेक कलाकारांच्या वेगवेगळ्या वैयक्तिक गोष्टींचा खुलासा झाला.
यावेळी या शोमध्ये कहानी घर घर की फेम रिंकू धवननेही स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. तिने मराठमोळा अभिनेता किरण करमरकरसोबत लग्न केलेले. पण त्यांचा घटस्फोट झाला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं.
रिंकूने कहानी घर घर की मालिकेतील तिचा सहकलाकार किरण करमरकरशी लग्न केलेले. पण लग्नाच्या १५ वर्षांनी त्यांचे नाते संपुष्टात आले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यामागचे कारण सांगताना ती म्हणाली की, ' आजचा दिवस कसा गेला, दिवसभरात काय काय केलं या सर्व गोष्टी मला किरणला सांगायच्या असायच्या पण किरण नेहमी झोपेत असल्याचे सांगत बोलणे टाळायचे.
मग मी अशा व्यक्तीच्या संपर्कात आले ज्याच्याशी मी माझ्या भावना आणि समस्या शेअर करू शकत होते. मला एकटं वाटायचं. पण माझ्या मुलामुळे मी त्या घरात राहिले आणि ते घर टिकवण्याचा प्रयत्न केला.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, एके दिवशी माझ्या माजी पतीने एक ईमेल पाहिला जो मी त्या मुलाला पाठवला होता. त्यात मी त्याच्याशी सर्व काही शेअर केले होते. त्यानंतर माझ्या माजी पतीने सर्वांना बोलावून त्याबद्दल गोंधळ घातला आणि म्हणून मी त्याच इमारतीतील दुसर्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला कारण मला माझ्या मुलाच्या दूर राहायचे नव्हते.
बिग बॉस बद्दल बोलायचे झाल्यास सध्या या शोमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, ईशा मालवीय, आयशा खान, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे कलाकार स्पर्धक म्हणून खेळत आहेत.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया