बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. या जोडप्याने 12 नोव्हेंबर रोजी आपल्या मुलीचे या जगात स्वागत केले. त्यांनी तिचे नाव देवी ठेवले. अलीकडेच बिपाशानेने देवीसाठी सत्यनारायण पूजेचे आयोजनही केले होते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने असा खुलासाही केला होता की, देवीच्या जन्मापासूनच तिच्या हृदयात दोन छिद्रे होती, त्यामुळे देवीला लहान वयातच शस्त्रक्रिया करावी लागली होती. हे बोलत असताना अभिनेत्री इतकी भावूक झाली की तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. सध्या देवी आनंदी आणि निरोगी आहे.
बिपाशाच्या मुलीच्या जन्मानंतर वाढलेल्या वजनावर बिपाशाची टिंगल करणाऱ्या ट्रोलर्सना बिपाशानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. एका मुलाखतीत, ती आणि करण पालकत्वाबद्दल बोलले आणि बिपाशाने ट्रोलिंगवर सांगितले की मी त्यांना सांगू इच्छिते की कृपया ट्रोल करत रहा. हे पूर्णपणे ठीक आहे कारण मला त्रास होत नाही. करणने ट्रोल्सवर आपले मत देखील शेअर केले आणि सांगितले की जोपर्यंत ते पाहात आहेत तोपर्यंत ठीक आहे…
आपल्या मुलीबद्दल बिपाशा म्हणाली की, प्रत्येक गोष्टीचा आणि कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर देवी पहिल्या क्रमांकावर असते. माझे डोळे उघडे असोत किंवा बंद असो, नेहमीच तिच दिसते. जेव्हा मी कुठेतरी बाहेर जाते तेव्हा मला शक्य तितक्या लवकर घरी परत जावे आणि तिच्याबरोबर राहावेसे वाटते. आता माझ्या आयुष्यातील सर्व काही तिच्याभोवती फिरते... करण तिसऱ्या क्रमांकावर आहे, मी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि देवी पहिल्या क्रमांकावर आहे.
हा मुद्दा पुढे नेत करणने विनोद केला आणि म्हणाला, मी एक गुलाम आहे ज्याचा एकेकाळी एक मालक होता पण आता माझे दोन मालक आहेत आणि मी अजूनही गुलाम आहे.