Close

अलना पांड्येच्या बेबी शॉवरमध्ये बिपाशाची लेक देवीचीच हवा, निरागसतेने जिंकल सर्वांच मन (Bipasha Basu’s Daughter Devi Steals Hearts At Alanna Panday’s Baby Shower)

अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडे तिच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे, ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे सतत चर्चेत असते. अलीकडेच अलना पांडेच्या बेबी शॉवरचे आयोजन करण्यात आले होते. या बेबी शॉवरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, मात्र या फंक्शनमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या लाडक्या देवीने आपल्या क्यूटनेसने शोमध्ये धुमाकूळ घातला.

अलाना पांडेच्या बेबी शॉवरमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरही उपस्थित होते. या जोडप्याने आपली मुलगी देवीसोबत तिथे उपस्थितीती लावली होता आणि देवी तिथे दाखल होताच तिने आपल्या गोंडसपणाने सर्वांची मने जिंकली.

बिपाशा देवीसोबत दाखल होताच पापाराझींनी त्यांना घेरले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा बिपाशाने देवीची पॅप्सशी ओळख करून दिली. बिपाशा देवीला पॅप्सला हाय कसे म्हणायचे हे शिकवत होती. पांढऱ्या रंगाच्या पोशाखात आणि तिच्या आवडत्या हेअर स्टाइलमध्ये देवी एखाद्या छोट्या परीसारखी दिसत होती आणि तिला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

जेव्हा पॅप्सने बिपाशाला विचारले की देवी देखील बंगाली बोलते का, तेव्हा बिपाशाने अभिमानाने सांगितले की देवीला अनेक बंगाली शब्द माहित आहेत. दरम्यान, बिपाशाने देवीला फोटोग्राफर्सना फ्लाइंग किस द्यायला शिकवले, पण देवी आश्चर्याने पॅप्सकडे पाहत राहिते. मात्र, ती त्यांना छान बाय देखील म्हणते. बेबी शॉवरमध्ये देवीने लाइमलाइट चोरली हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरने २०२२ मध्ये मुलगी देवीचे स्वागत केले होते. हे जोडपे आपल्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतात, पण आपल्या मुलीचा चेहरा कधीच दाखवत नाहीत.

Share this article