बंगळुरुमध्ये देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस निर्माण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ४५ दिवसांच्या मुदतीपूर्वी २ दिवस आधीच याचे उद्घाटन केले गेले.
दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिल्या ३ डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले आहे. हे ऑफिस बेंगळुरूमधील कँब्रिड लेआउटमध्ये बनवले गेले आहे. विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी ४५ दिवसांची मुदत असताना हे ४३ दिवसात बनवून तयार झाले.
आयआयटी मद्रासच्या मदतीने हे ऑफिस एलएंडटी ने बनवले आहे. अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, बंगळुरु भारताची नवी प्रतिमा सादर करते. तुम्ही थ्री डी पोस्ट ऑफिसला ज्या रुपात पाहात आहात, तेच भारताचे रुप आहे.
या आधुनिक टपाल कार्यालयाचे निर्माण १,०२१ स्क्वेअर फुटाचं करण्यात आले आहे. यासाठी ३डी कंक्रीट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
एलएंडटी कंपनीचे म्हणणे आहे की, रोबोटिकच्या मदतीने एम्बेडेड डिझाइन बनवण्यात आली आहे. याला ४३ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. सामान्यपणे याला ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो. या तंत्रज्ञानामुळे २३ लाखांचा खर्च आला आहे. जो पारंपरिक पद्धतीने खर्च होणाऱ्या खर्चाहून ३० ते ४० टक्के कमी आहे.
भवन निर्माणासाठी मशीन व रोबोटचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीत कोणतेही व्हर्टिकल पीलर नाहीत. ३-डी प्रिंटिंग पद्धत डेनमार्कहून आयात करण्यात आली होती. या खास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंक्रीट फुटिंग आणि तीन स्तराची भिंत बांधण्यात आली आहे.