Close

बिझनेस पार्टनरनेच विवेक ओबेरॉयला लुटलं, १.५५ कोटींला घातला गंडा (business partner who robbed Vivek Oberoi, cheated him of 1.55 crores)

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची १.५५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अभिनेत्याने त्याच्या बिझनेस पार्टनर विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विवेक ओबेरॉयने , आरोपींनी आकर्षक परताव्याची हमी देऊन एका कार्यक्रमात आणि चित्रपट निर्मिती फर्ममध्ये पैसे गुंतवून घेतले. मात्र नंतर आरोपींनी या रकमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असा आरोप केला आहे. मुंबई एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान झालेल्या करारानुसार ओबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीचे नाव बदलून आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करणे आणि चित्रपटांची निर्मिती करणे हे या नवीन व्यवसायाचे काम होते. आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये भागीदार म्हणून संजय आणि त्याच्या आईची नावेही जोडली गेली. संजयच्या ओळखीच्या असलेल्या राधिकाला फर्ममध्ये भागीदार म्हणून जोडण्यात आले आणि अभिनेत्याची पत्नी प्रियांकाला राजीनामा देण्यास सांगण्यात आले.

२०२२ च्या सुरुवातीस, विवेक ओबेरॉयने त्याच्या गुंतवणुकीचे तपशील तपासले तेव्हा संजय आपल्या निधीचा गैरवापर करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. जेव्हा अभिनेत्याने फर्मच्या व्यवस्थापकाशी यावर चर्चा केली तेव्हा त्यांनीही याची पुष्टी केली. एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की विवेक ओबेरॉयने त्याच्या सीएला यासंबंधी शोध घेण्यास सांगितला तेव्हा असे आढळले की संजय, नंदिता आणि राधिका यांनी कथितपणे विमा पेमेंट, दागिने खरेदी करणे, पगार काढणे इत्यादी वैयक्तिक खर्चासाठी फर्मच्या ५८.५६ लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केला आहे.

Share this article