विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी अनेकदा संवाद साधते. विद्याचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र याच दरम्यान विद्या बालनने एका बनावट इंस्टाग्राम अकाउंटसंबंधी चाहत्यांना आवाहन केले आहे.
चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या नावाने इन्स्टाग्रामवर फॅन पेज अकाऊंट चालू करतात. त्यात त्यांचे फोटो व्हिडिओ शेअर करतात. असाच एक युजर विद्या बालनच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहे. विद्याने तिच्या पोस्टमध्ये त्या अकाउंटबद्दल लिहिले. - "सर्वांना नमस्कार... आधी फोन नंबर आणि आता कोणीतरी माझ्या नावाने खाते चालवत आहे. या अकाऊंटवरून तो माझ्या नावाने लोकांशी संपर्क साधत आहे.
विद्याने पुढे लिहिले की, मी आणि माझ्या टीमने हे अकाउंट रिपोर्ट केले आहे. तुम्ही ही हे खाते रिपोर्ट आणि ब्लॉक करा. हे आमच्यासाठी खूप चांगले असेल. तो माझ्या अनेक मित्रांशी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांशी बोलत असतो. कृपया त्याला एंटरटेन करू नका आणि त्याला रिपोर्ट करुन ब्लॉक करा."