राम आणि सीता फेम गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे सोशल मीडियावरील सर्वात लाडके जोडपे आहेत. गुरमीत आणि देबिना सध्या त्यांच्या दोन मुली लियाना चौधरी आणि दिविशा चौधरी यांच्यासोबत आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा एन्जॉय करत आहेत. सध्या, हे जोडपे त्यांच्या मुलींसह त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कौटुंबिक सुट्टीवर गेले आहे. दुबईत ते सुट्टीचा आनंद घेत आहे. तिथून देबिनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
देबिना आणि गुरमीत त्यांच्या मुली लियाना आणि दिविशासह दुबईमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत, जिथे देबिना संपूर्ण कुटुंबासह तिची सर्वात चांगली मैत्रीण आणि बिग बॉसची माजी स्पर्धक डिम्पी गांगुलीला भेटण्यासाठी गेली होती. देबिनाने तिच्या कुटुंबासोबत काही सुंदर क्षण घालवले होते. ज्याची झलक तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
देबिनाने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या दोन मुलींसोबत आणि डिंपी तिच्या मुलांसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे मोठे हसू पाहून सर्वांनी मिळून किती आनंद लुटला, याचा अंदाज येतो. विशेषत: लियाना आणि दिविशा खूप मस्ती करताना दिसल्या. गुरमीतही फोटोच्या एका फ्रेममध्ये दिसत होता.
ही छायाचित्रे शेअर करताना देबिनाने कॅप्शनमध्ये, "आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत... आम्ही खूप लांब आलो आहोत मम्मा.. आणि आम्ही अजूनही मजबूत उभे आहोत. आम्ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही फोटो अस्पष्ट आहेत आणि काही अनाकलनीय पोझ आहेत, पण ती खरी वाटतात. @dimpy_g (तुझ्यावर खूप प्रेम आहे) तुमच्या साधेपणाने सर्वांना प्रेरणा देत राहा."
याशिवाय देबिनाने इन्स्टा स्टोरीवर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डिम्पीला मिठी मारण्याचा प्रयत्न करते, पण लहान दिविशाला तिची आई दुसऱ्या कोणालातरी मिठी मारते हे मान्य करत नाही. देबिना आणि डिंपी देखील या क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत.
राहुल महाजनची माजी पत्नी आणि बिग बॉस स्पर्धक डिम्पी गांगुलीने 2015 मध्ये रोहित रॉयशी लग्न केले होते. डिम्पी पती रोहितसोबत दुबईत राहते. या जोडप्याला रीना, आर्यन आणि रिशन ही तीन मुले आहेत, ज्यांच्यासोबत डिंपी खूप आनंदी आहे.