दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. दोघांची जोडी नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी ही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केले. त्याआधी दोघं एकमेकांना जवळपास सहा वर्षांपर्यंत डेट करत होते. लग्नाच्या पाच वर्षांनंतर आता फॅमिली प्लॅनिंगविषयी दीपिका व्यक्त झाली आहे.
‘वोग सिंगापूर’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका तिच्या आईवडिलांनी केलेल्या संगोपनाविषयी बोलत होती. “मी ज्या लोकांसमोर लहानाची मोठी झाले, माझ्या काकू, काका, फॅमिली फ्रेंड्स.. ते नेहमीच मला सांगतात की मी जराही बदलले नाही. ते आमच्या संगोपनाविषयी अनेकदा बोलतात. या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर बदलणं खूप सोपं असतं. ती हवा डोक्यात जायला वेळ लागत नाही. पण मला माझ्या घरी कोणीच सेलिब्रिटीची वागणूक देत नाहीत. मी माझ्या घरी असताना एक सामान्य मुलगी आणि सामान्य बहीण असते. ही गोष्ट कधीच बदलू नये असं मला वाटतं. माझ्या कुटुंबीयांमुळे माझे पाय जमिनीवर राहतात. हेच मूल्य मला आणि रणवीरला आमच्या मुलांमध्ये रुजवायचे आहेत”, असं दीपिका म्हणाली.
मुलांबद्दल बोलताच दीपिकाला पुढचा प्रश्न तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आला. “तू याबद्दल काही विचार किंवा प्लॅनिंग करतेय का”, असं तिला विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना दीपिका पुढे म्हणाली, “अर्थातच. रणवीर आणि मला लहान मुलं खूप आवडतात. आमच्या स्वत:च्या कुटुंबाची सुरुवात कधीपासून करू शकू, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.”
सध्या दीपिकाच्या या वक्तव्यांची सोशल मिडियावर खुप चर्चा आहे. दोघांचे चाहते या बातमीनंतर खुपच खुश आहेत.
दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या आगामी 'फाइटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. हा २५ जानेवारीला जगभरात रिलीज होणार आहे.