दीपिका पादुकोणच्या पिवळ्या रंगाच्या मॅटर्निटी गाऊनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता दीपिकाने या गाऊनचा लिलाव केला असून त्याला चांगली रक्कम मिळाली आहे. ही रक्कम दान करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
'फेक बेबी बंप' म्हणून नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या ब्युटी ब्रँडशी संबंधित हा कार्यक्रम होता. यावेळी दीपिकाच्या पिवळ्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
पिवळ्या रंगाचा गाऊन, मेसी बन आणि सिंपल कानातले.. असा दीपिकाचा हा लूक होता. या मॅटर्निटी गाऊनमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या गाऊनचा नुकताच लिलाव करण्यात आला. या लिलावातून मिळालेली रक्कम ती दान करणार आहे.
दीपिकाने या पिवळ्या गाऊनचा लिलाव करणार असल्याचं जाहीर करताच अवघ्या वीस मिनिटांत हा गाऊन विकला गेला. त्याला ३४ हजार रुपये इतकी किंमत मिळाली. ही रक्कम चांगल्या कारणासाठी दान करणार असल्याचं दीपिकाने सांगितलं आहे.
दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. येत्या सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने सांगितलं होतं. पिवळ्या गाऊनमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळत होता.
काही दिवसांपूर्वी दीपिकाचा बेबी बंप फेक असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. त्याविरोधात काही बॉलिवूड अभिनेत्रींनीही नाराजी व्यक्त केली होती. यात आलिया भट्टचाही समावेश होता.