Close

अभिनेता होण्यापूर्वी गुफी पेंटल होते भारतीय सैनिक, चीनच्या सीमेवर झालेली पोस्टींग (Did You Know Gufi Paintal Was An Indian Army jawan Before Becoming An Actor?)

हिंदी चित्रपटांचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या टीव्ही मालिकेत शकुनी मामाची भूमिका करणाऱ्या गुफी पेंटल यांचे ५ जून रोजी निधन झाले. पण तु गुफी पेंटल अभिनेता होण्यापूर्वी भारतीय सैन्यात होते.

शकुनी मामा या व्यक्तिरेखेने घराघरात प्रसिद्ध झालेले गुफी पेंटल यांचे ५ जून रोजी मुंबईत निधन झाले. गुफी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 5 जून रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

काही काळापूर्वी गुफी पेंटलने दैनिक भास्करला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान गुफी पेंटलने सांगितले होते - 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू होते, तेव्हा ते अभियांत्रिकी अभ्यासक्रम करत होते. त्या काळात कॉलेजमध्ये युद्धकाळात सैन्य भरती सुरू होती. मला नेहमी चीन सीमेवर जायची  इच्छा होती.

आपला मुद्दा पुढे करत गुफी म्हणाले- जेव्हा ते सैन्यात भरती झाले तेव्हा त्यांची पहिली पोस्टिंग चीनच्या सीमेवरच झाली. लष्कराच्या मनोरंजनासाठी देशाच्या सीमेवर टीव्ही आणि रेडिओ नव्हते. त्यामुळे लष्कराचे जवान स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी सीमेवर रामलीला करत असत आणि त्या रामलीलामध्ये गुफी सीतेची भूमिका करायचे.

मुंबईत आल्यानंतर गुफी पेंटलने आपल्या अभिनय कारकिर्दीला मॉडेलिंगपासून सुरुवात केली. मॉडेलिंगसोबतच गुफी यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. गुफी पेंटलला 1975 मध्ये पहिला चित्रपट मिळाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला 'रफुचक्कर' मधून सुरुवात केली. त्यानंतर ते 'दिल्लगी', 'देस परदेस', 'दावा', 'सुहाग' आणि 'घूम' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले.

Share this article