Close

प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना मृद्‍गंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर(Dilip Prabhavalkar Marathi Actor Mrudgandha Lifetime Achivement Award 2023)

दरवर्षी विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृद्‍गंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृद्‍गंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्‍गंध पुरस्कार’ वितरणाचा सोहळा २६ नोव्हेंबरला ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

Share this article