वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे भोजनगृह सुद्धा असते. स्वयंपाकघरात बनवलेले जेवण घरातील सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे आनंदाने अन्नग्रहण करावे हीच त्या मागील संकल्पना असते. अर्थात पूर्वीच्या काळी भोजनगृहासाठी वेगळी व्यवस्था असायची. पण सध्याच्या घरांमध्ये जागेच्या अभावामुळे स्वतंत्र असे भोजनगृह बनवणे अशक्य झाले आहे. तरीही आधुनिक वास्तुशैलीमध्ये डायनिंग टेबल आपल्याला पाहायला मिळते.
जे नियम भोजनगृहाला लागू होतात, तेच नियम घरातील डायनिंग टेबलला सुद्धा लागू होतात, हे लक्षात ठेवावे.
- भोजनगृह पश्चिमेस असावे, ते दक्षिणेस असू नये.
- भोजनगृहात भोजन करताना मुख्य व्यक्तीचे तोंड पूर्वेस असावे.
- भोजनगृहात ईशान्येस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.
- भोजनगृहातील वॉश बेसिन पूर्व अथवा उत्तरेस असावे.
- भोजनगृहातील डायनिंग टेबल चौरसाकृती किंवा आयताकृती असावे.
- भोजनगृहात डायनिंग टेबलासमोरच्या भिंतीवर उत्साहवर्धक पोस्टर असावे.
- डायनिंग टेबलवर ताजी फळे असावीत. कुजलेली किंवा काळी पडलेली फळे त्वरित काढून टाकावीत.
- भोजनगृहात कुठेही हिंस्त्र प्राण्यांची चित्रे असू नयेत.
- भोजनगृहात कुठेही दुःखी व्यक्तीची कॅलेंडर्स, फोटो, चित्रं लावू नयेत.
- भोजनगृहात दिवंगत व्यक्तीचा फोटो लावू नये.
- भोजनगृहाला लागून शौचालय असू नये.
- भोजनगृहाच्या समोर शौचालयाचे दार असू नये.
- भोजनगृहात चेंबलेली, गळकी भांडी ठेवू नयेत.
- भोजनगृहात वाया गेलेले अन्न, आंबलेले, बुरशी आलेले पदार्थ ठेवू नये.
- भोजनगृहात शिळे अन्न ठेवू नये.
- भोजनगृह स्वच्छ ठेवावे.
- भोजनगृहात भरपूर प्रकाशयोजना असावी.
- भोजनगृहातील भिंतींना फिकट रंग द्यावेत. भडक रंग (लाल, केशरी, निळा इत्यादी) देऊ नये.
- भोजनगृहात भोजनास बसताना दक्षिणेकडे तोंड करून बसू नये.
- भोजनगृहाच्या वर टॉयलेट-बाथरूम असू नये.
- स्वयंपाकघर खाली आणि भोजनगृह वर अशी रचना असू नये.
- भोजनगृहास पूर्व, उत्तर अथवा पश्चिमेस दरवाजा असावा.
- भोजनगृहाचे दार आणि मुख्य प्रवेशद्वार समोरासमोर असू नयेत.
- भोजन करण्यापूर्वी वास्तूतील प्राणांना, पशु-पक्षी, गाय इत्यादींना आधी अन्न द्यावे.
- भोजनगृहात शक्यतो धातूंपासून तयार केलेल्या वस्तुंचे प्रमाण कमी असावे.
- भोजनगृहात लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रमाण अधिक असावे.
- भोजनगृहात डायनिंग टेबल शक्यतो लाकडी असावे. खुर्च्या लाकडी असाव्यात.
- भोजनगृहात भोजनासाठी डायनिंग टेबलपेक्षा भारतीय बैठक चांगली. बसण्यासाठी लाकडी पाट असावेत.
- समोर भरलेले ताट आल्यावर श्रीअन्नपूर्णा मातेचे स्मरण करून अन्नग्रहण करणे ही आपली संस्कृती आहे. जमेल तितके आपण ह्या सर्व गोष्टींचे पालन करून स्वस्थ व समृद्ध आरोग्य नक्कीच मिळवू शकतो.