Close

दीपिका कक्करने टिपला बापलेकाचा सुंदर क्षण, चाहतेही झाले खुश (Dipika Kakar Shares Adorable Picture Of Shoaib Playing With Their Son)

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम नुकतेच पालक झाले आहेत. 21 जून रोजी या जोडप्याने त्यांच्या मुलाचे स्वागत केले. प्रीमॅच्युर प्रसूतीमुळे लहान मुलाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते पण आता तो घरी आला असून तो एक महिन्याचा आहे.

रुहान एक महिन्याचा असताना हा फोटो शेअर करण्यात आला होता

जोडप्याने मुलाचे नाव देखील ठेवले आहे आणि आता ते त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहे. शोएब त्याच्या अंजुई शोमध्ये व्यस्त आहे पण जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो रुहानसोबत वेळ घालवतो.

दरम्यान, दीपिकाने एक गोंडस क्षण टिपला आहे ज्यामध्ये शोएब लहान रुहानसोबत खेळताना दिसत आहे. लहान बाळ आपल्या इवलुशा हाताने वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करताना दिसत आहे.

दीपिकाने हा फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे - मेरा सुकून, तसेच हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.

दीपिका आणि शोएब लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. रुहानही आता निरोगी असल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला आहे. हे जोडपे YouTube व्लॉग्सद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात आणि बाळाच्या सर्व गोष्टी आणि दिनचर्या शेअर करतात. मुलाच्या नामकरण सोहळ्याचा व्हिडिओही दीपिकाने शेअर केला होता आणि घरात बाळाच्या स्वागताचा व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आजोबा म्हणजेच शोएबचे वडील नातवाला पहिल्यांदा पाहून खूप भावूक झाले होते.

Share this article