बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलनं विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मात्र आता ती पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'दो पत्ती' (Do Patti) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये काजोज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात क्रिती सेनन देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे.
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दो पत्ती चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सनं क्रिती आणि काजोलला टॅग करत दो पट्टी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरला कॅप्शन देण्यात आलं, "कोणतीही पहिली गोष्ट ही कायमच खास असते, काजोल पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर क्रिती सॅननचा हा पहिला थ्रिलर चित्रपट. 'दो पत्ती' लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे."
दो पत्ती या चित्रपटाच्या टीझरमध्ये काजोल एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे तर क्रिती सेनन सायको किलर वाटत आहे. खरं काय आहे? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
दो पत्ती या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. परंतु या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अभिनेता शाहीर शेख हा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दो पत्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक चतुर्वेदी यांनी केले आहे, तर चित्रपटाची कथा कनिका धिल्लन यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील काजोल आणि क्रितीचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.