गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी यांनी पौराणिक टीव्ही मालिका 'रामायण' मध्ये भगवान राम आणि सीता यांच्या भूमिका साकारून लोकांची मने जिंकली. टीव्हीवरील लोकप्रिय रोमँटिक जोडप्यांपैकी एक असलेले गुरमीत आणि देबिना लग्नाच्या अनेक वर्षांनी दोन मुलींचे पालक झाले आहेत आणि त्यांचे पालकत्व उपभोगत आहेत. देबिना बॅनर्जी पडद्यापासून दूर राहून आपल्या दोन मुलींच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. अनेकदा त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवते. अनेक युजर्सचं असं म्हणणं आहे की देबिना तिच्या दोन मुलींमध्ये भेदभाव करते. असे म्हणणाऱ्यांना आता अभिनेत्रीचा पती गुरमीत चौधरीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
खरं तर, अनेक सोशल मीडिया यजर्सनी दावा केला आहे की देबिना बॅनर्जी तिच्या एका मुलीबद्दल पक्षपाती आहे. ती दोन मुलींमध्ये भेदभाव करते. आता देबिनाचा पती गुरमीत चौधरी याने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांने पत्नीचा बचाव केला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गुरमीत चौधरीने आपल्या पत्नीचा बचाव केला आणि सांगितले की, देबिनाला जेव्हा सांगितले जाते की ती आपल्या दोन मुलींमध्ये भेदभाव करते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. अशा टिप्पण्या घृणास्पद आणि आईला दुखावणाऱ्या आहेत हे नाकारता येत नाही.
गुरमीत म्हणाला की, देबिनाला अशा कमेंट्स ऐकून वाईट वाटते, लोक कसे विचार करू शकतात की एखादी आई आपल्या मुलीशी भेदभाव करेल? अभिनेत्याने पुढे सांगितले की, चाहत्यांच्या सकारात्मक कमेंट्स वाचून देबिना खूश असते, म्हणूनच ती ट्रोलकडे जास्त लक्ष देत नाही.
ज्यांना वाटते की आई आपल्या मुलांशी पक्षपाती असू शकते ते मुर्खाशिवाय आणखी काही नसतात. तो अनेकदा आपल्या पत्नीला अशा निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नको असे सांगतो, कारण हे लोक बहुतेक बेरोजगार असतात आणि सोशल मीडियावर अश्लील टिप्पण्या पोस्ट करण्यापूर्वी काहीही विचार करत नाहीत.
देबिना बॅनर्जीची मुलगी लियानाचा जन्म आयव्हीएफच्या मदतीने झाला होता, ज्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या अनेक मुलाखती आणि व्लॉग्समध्ये देखील सांगितले आहे. देबिनाने खुलासा केला आहे की तिला एंडोमेट्रिओसिसचा त्रास होता, ज्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला 5 वर्षात 4 IUI आणि 5 IVF सायकल पार करावी लागली, त्यानंतरच तिने लियानाला जन्म दिला. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)