Close

नव्या तिसऱ्या डॉनचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! (Don 3 Teaser Out)

अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर याने नुकतीच त्याच्या ‘डॉन ३’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता आता गगनाला भिडली आहे. आधी फरहानने केवळ चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, आता त्याने या चित्रपटाचा टीझर शेअर करून मुख्य अभिनेत्याची झलक देखील दाखवली आहे. यावेळेस शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, ज्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. टीझरमधून फरहान अख्तरने ‘डॉन ३’च्या मुख्य अभिनेत्याचा खुलासा देखील केला आहे. अभिनेता जरी नवा असला, तरी ‘डॉन’चा अंदाज मात्र जुनाच असणार आहे. या टीझरमध्ये देखील ‘डॉन’चा आयकॉनिक डायलॉग ऐकायला मिळाला आहे.

फरहान अख्तर याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘डॉन ३’चा टीझर रिलीज केला आहे. यासोबतच त्याने चित्रपटातील मुख्य अभिनेत्याचा चेहराही रिव्हील केला आहे. या टीझरमध्ये भन्नाट संवाद ऐकायला मिळाले आहे. रणवीर सिंहने देखील आपल्या दमदार शैलीत ‘डॉन’चा आयकॉनिक डायलॉग म्हटला आहे.

 ‘डॉन ३’मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती. मात्र, कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. या चित्रपटात शाहरुख खानसारख्या सुपरस्टारची जागा इतर कुणी घेऊ शकेल याचा विचारही कुणी केला नव्हता. मात्र, आता ‘डॉन ३’च्या टीझर रिलीजसह, रणवीर सिंह या चित्रपटात ‘डॉन’ची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९७८मध्ये ‘डॉन’ हा चित्रपट पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर फरहान अख्तरने २००६ आणि २०११ मध्ये शाहरुख खानला घेऊन ‘डॉन’चे २ सिक्वेल केले. आता फरहान अख्तर एक नवा चेहरा ‘डॉन’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

Share this article