टीव्ही क्वीन एकता कपूर तिच्या कामासाठी इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय आहे. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही सतत चर्चेत असते. एकता कपूर सिंगल मदर असल्याची माहिती बहुतेकांना आहे, पण एकताने अजून लग्न का केले नाही हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, तर वयाच्या १५ व्या वर्षी तिला लग्नाची स्वप्ने पडू लागली होती. यासोबतच लोकांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की, तिचे नाव चित्रपट निर्माता करण जोहरसोबत का जोडले गेले? जाणून घेऊया सविस्तर.
एकता कपूर ही टीव्ही मालिकांची जान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, तिने निर्मिती केलेल्या बहुतेक मालिका हिट होतात, म्हणून तिला टीव्हीची राणी म्हटले जाते. डेली सोप व्यतिरिक्त, एकता कपूर रिअॅलिटी शो आणि चित्रपटांची निर्मिती देखील करते.
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते जितेंद्रची लाडकी लेक एकता कपूरला तू अद्याप लग्न का केले नाही हा प्रश्न सारखा विचारला जातो, तर तिने वयाच्या १५व्या वर्षापासून लग्नाची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती, परंतु तिच्या वडिलांनी एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे एकताचे संपूर्ण आयुष्य बदलले आणि लग्नाऐवजी तिने आपले सर्व लक्ष कामावर केंद्रित केले.
टीनएजमध्ये एकता कपूर खूप पार्ट्या करायची. एकताला पार्टी करण्याची आवड पाहून एकदा जीतेंद्रंना तिचा खूप राग आला आणि त्यांनी आपल्या मुलीला सांगितले की तू लग्न कर आणि अशीच पार्टी करत राहा नाहीतर, आयुष्यात गंभीर होऊन कामावर लक्ष केंद्रित कर.
रागाच्या भरात वडिलांचे हे बोलणे ऐकून एकता कपूरला धक्काच बसला, मग त्याचवेळी तिने ठरवले की तीही तिच्या वडिलांप्रमाणे चांगली काम करून कुटुंबाचे नाव उंचावणार. यानंतर एकताने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि मालिका बनवायला सुरुवात केली.
एकता कपूर 47 वर्षांची आहे, तरीही तिने अद्याप लग्न केलेले नाही. ती एका मुलाची सिंगल मदर आहे. 27 जानेवारी 2019 रोजी एकता सरोगसीद्वारे आई झाली. एका मुलाखतीत एकताने सांगितले होते की, माझ्या वडिलांनी सांगितले होते की एकतर तू लग्न कर किंवा नोकरी कर, त्यामुळे मी लग्नाऐवजी कामाची निवड केली. ती म्हणाली होती की मी माझ्या अनेक मित्रांची लग्ने आणि घटस्फोट पाहिले आहे, कदाचित त्यामुळेच मी आतापर्यंत वाट पाहत आहे.
एकता कपूर आणि करण जोहरच्या नात्याबद्दल अनेकजण गुगलवर सर्च करतात. खरे तर एकदा चित्रपट निर्माता करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याला आणि एकताला जोडीदार मिळाले नाही तर दोघे एकमेकांशी लग्न करतील. त्यामुळे त्याची आई खूप आनंदी होईल कारण ती एकता कपूरच्या मालिकांची मोठी चाहती आहे.
मात्र, एकता कपूरकडे पाहता ती अविवाहित असूनही आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहे. दुसरीकडे, तिच्या नेट वर्थबद्दल बोलायचे तर, रिपोर्ट्सनुसार, एकता कपूर दर महिन्याला सुमारे 1 कोटी कमवते, त्यानुसार तिची वार्षिक कमाई 12 कोटी आहे, तर तिची एकूण मालमत्ता सुमारे 103 कोटी आहे.