१२ वी फेल प्रदर्शित झाल्यानंतर तो एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असे वाटले नव्हते. परंतु या चित्रपटाने सगळ्यांना आपले मत बदलण्यास भाग पाडले. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये प्रेक्षक माझ्या या चित्रपटाचे भरभरून स्वागत करतील, असे वक्तव्य केले होते. अन् त्याप्रमाणे बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले.
बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांकडून १२ वी फेलचे कौतुक करण्यात आले. त्यात आता फायटर फेम हृतिक रोशनच्या नावाची देखील भर पडली आहे. त्यानं १२ वी फेल पाहिल्यानंतर त्याविषयी एक्स अकाउंटवर खास पोस्ट शेयर केली आहे. त्यातून त्यानं त्या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय…
अखेर मी १२ वी फेल पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर एक मास्टरक्लास कलाकृती पाहिल्याचा आनंद झाला. या चित्रपटातील अनेक गोष्टींनी मी खूपच प्रभावित झालो. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास त्यातील साऊंड आणि साऊंड इफेक्ट्स तुम्हाला प्रभावित करणारे आहेत. मला मिस्टर चोप्रा यांचे खास कौतुक करायचे आहे. त्यांनी खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ऋतिकच्या त्या पोस्टनंतर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. १२ वी फेल मध्ये ज्या कलाकारांनी काम केले त्यांचेही कौतुक, एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर मी प्रभावित झालो. असेही ऋतिकनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऋतिकच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा आणि दीपिकाचा फायटर नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जानेवारी रोजी तो प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यातील ऋतिक आणि दीपिकाचा कडक अंदाज चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.