Close

भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असलेल्या ‘ॲसिड’ (आघात) या चित्रपटाचा मराठी ओटीटीवर डिजिटल प्रिमिअर (Film Based On Acid Attackers To Stream On Marathi OTT: Digital Premier Of “Aaghat”)

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर आज वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

केरळमधील ॲसिड हल्ल्यातील गुन्हेगार राज्याच्या विविध भागातून बेपत्ता होतात. ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या मुलींच्या घरासमोर या गुन्हेगारांना त्यांच्या कापलेल्या लिंगासह टाकण्यात येते. या वारंवार घडणाऱ्या घटना समाजात व्हायरल होतात आणि लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागतात. मात्र ही कृत्ये करणारा अज्ञात कोण आहे याचा सुगावा लागत नाही. नेमका कोण असेल हा अज्ञात,  हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपट हा मूळ मल्याळम भाषेत असून याचे मराठी रूपांतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

“समाजात विक्षिप्त मानसिकतेचे लोक आणि त्यांचे विक्षिप्त कृत्य मनाला हेलावून टाकणारे असतात. समाजातील ही विक्षिप्तता दाखवणारा ‘ॲसिड’ (आघात) चित्रपट प्रेक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करेल अशी खात्री वाटते.

Share this article